





News
Shooting academy scripts Aurangabad girl's meteoric rise to fame

-----------------------------------------------------------------
नेमबाजी स्पर्धेत जयसिंग, पार्थ, कृपा, हर्षदा प्रथम

औरंगाबाद (लोकमत 28-जुलै-2014) : जिल्हा रायफल संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत एमजीएम शूटिंग अकॅडमीच्या जयसिंग राजपूत, पार्थ साळुंके, कृपा पटेल, हर्षदा निठवे व वर्षा वरकड यांनी विविध गटात प्रथम क्रमांक मिळवला. विभागीय क्रीडा संकुलावर झालेल्या या स्पर्धेत १0१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यात एमजीएमच्या २५ खेळाडूंनी पदकांची कमाई केली. विविध गटांतील पदकविजेते : सुवर्णपदक (पिस्टल) - जयसिंग राजपूत, पार्थ साळुंके, कृपा पटेल, हर्षदा निठवे, वर्षा वरकड, रौप्य : तेजश्री वरकड, संकेतकुमार औताडे, ऋषभ धाबे, वैभव गाडेकर, सिद्धी पाटील. कास्य : सार्थक निठवे, हर्षल कोंडके, रिद्धी पाटील, अबोली व्यवहारे. रायफल शूटिंग : प्रसाद राठोड, महेश मगर, अमृता वासडीकर, रौप्य : गायत्री घाणेकर, ऐश्वर्या ठेंगे, आशिष बोराडे, कौशल जाधव, उमेश ऐनलवार, कास्यपदक : सिद्धांत पवार, वेदांत जाधव, सिद्धांत देशमुख. खेळाडूंना प्रशिक्षक संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, क्रीडा विभागप्रमुख श्याम तळेगावकर आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
औरंगाबादची हर्षदा निठवे भारतीय नेमबाजी संघात

-----------------------------------------------------------------
नेमबाजी स्पर्धेत हर्षदा निठवे कास्यपदक
